Protein Deficiency Symptoms : शरीरात प्रोटीन कमी पडतंय? 'या' ८ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका!

पुढारी वृत्तसेवा

शरीरात प्रोटीन कमी झाल्यास आरोग्य बिघडू शकते. जाणून घ्या प्रोटीनच्या कमतरतेची ८ लक्षणे!

प्रोटीनमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. जेवणात प्रोटीन कमी आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असल्यास वारंवार भूक लागते.

आहारात सतत प्रोटीनची कमतरता राहिल्यास शरीरातील स्नायूंचे प्रमाण (Muscle Mass) कमी होऊ लागते.

प्रोटीनच्या कमतरतेमुळे व्यायामानंतर शरीराला रिकव्हर होण्यााठी आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत. वर्कआउटनंतर स्नायू खूप वेळ दुखत राहतात.

शरीर आधी महत्त्वाच्या अवयवांना प्रोटीन पुरवते, ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होऊन केस गळू लागतात.

फोटो ७ त्वचेवरील कोणतीही जखम भरण्यास जास्त वेळ लागतो. नवीन ऊती (Tissues) तयार करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक असते.

प्रोटीनच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात आणि शरीरातील ऊर्जा पातळी ढासळते.दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

शरीरात प्रोटीनचे प्रमाण गंभीररीत्या कमी झाल्यास रक्तात द्रव साचून सूज येऊ शकते.

तुम्ही वारंवार आजारी पडताय ? प्रोटीन प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते, त्यामुळे त्याची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्‍यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.