पुढारी वृत्तसेवा
प्रथिनांचा (प्रोटीन) उत्तम स्रोत म्हणून अंडी ओळखली जातात, आहारात अंडी ही सर्वात सामान्य अन्नपदार्थांपैकी एक आहेत
अंडी शरीराच्या अनेक कार्यांना मदत करणाऱ्या पोषक घटकांपैकी एक आहेत
मेंदूचे आरोग्य, ऊर्जा पातळी, त्वचा, केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंडी अधिक फायदेशीर आहेत
जर 14 दिवस दररोज अंडी खाल्ली तर काय होऊ शकते. याबाबत साधे आणि शास्त्रीय आधार असलेले फायदे खालील दिलेले आहेत
अंड्यांमधील कोलीनमुळे शरीरात अॅसिटाइलकोलीन नावाचे न्यूरोट्रान्समीटर तयार करतो, त्यामुळे विचार करण्याची क्षमता आणि एकाग्रता सुधारू शकते
संतुलित प्रमाणात अंडी खाल्ली तर “चांगले” कोलेस्टेरॉल (HDL) वाढण्यास मदत होते. ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते
अंड्याच्या पिवळ्या बलकात ल्युटीन आणि झिअॅक्सँथिन हे अँटिऑक्सिडंट्स असतात. हे डोळ्यांना हानिकारक निळ्या प्रकाशापासून संरक्षण करतात
अंड्यांमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ले असतात, जी केराटिन तयार करण्यास मदत करतात
केराटिन हा मजबूत केस, निरोगी त्वचा आणि नखांसाठी महत्त्वाचा प्रथिन आहे