Health Benefits of Dates : रोज खजूर खाल्ल्याने शरीरात काय होते? पाहा 'हे' १० चमत्कारी फायदे!

पुढारी वृत्तसेवा

आयुर्वेदात खजुराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महर्षी चरक आणि सुश्रुत यांच्या संहितेतही खजुराच्या पौष्टिक आणि श्रमपरिहारक गुणांचा गौरव केला आहे.

व्यवस्थित पिकलेल्या रसदार फळाला 'खजूर' म्हणतात, तर याच फळाला अर्धवट पिकवून वाळवल्यानंतर त्याची पौष्टिक 'खारीक' तयार होते.

खजुराची उत्पत्ती प्रामुख्याने अरबस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या वाळवंटी प्रदेशात होते.

आयुर्वेदानुसार, खजूर दुधात उकळून खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. आधुनिक संशोधनानुसार, यात मुबलक प्रमाणात असणार्‍या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

आयुर्वेदानुसार खजूर हा 'शीतदायी' म्हणजेच थंड प्रकृतीचा आहे. त्यामुळे शरीराचा दाह (जळजळ) कमी करण्यासाठी तो उत्तम मानला जातो.

खजुरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्‍याने बरदुखी, कफयुक्त सर्दी आणि संधिवाताच्या त्रासात मोठा दिलासा मिळतो.

खजूरपचण्यास जड असला तरी तो आतड्यांमधील हानिकारक कृमी नष्ट करतो. तसेच यातील फायबर्स बद्धकोष्टतेचा त्रास कमी करतात.

खजुराच्या बियाही गुणकारी आहेत. या बियांची राख अनेक त्वचाविकारांवर आणि औषधांमध्ये वापरली जाते.

खजूर सेवनामुळे शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडण्यास मदत होते.

खजूर अत्यंत बलवर्धक आणि पौष्टिक असला तरी आयुर्वेदानुसार प्रत्येकाने आपल्या पचनशक्तीनुसार त्याचे प्रमाण ठरवावे, असेही

येथे क्‍लिक करा.