Monsoon Immunity foods : पावसाळ्यात सर्दी-खोकला राहील कोसो दूर! 'हे' ७ सुपरफूड्स करतील जादू ...

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात आजारांपासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवणे.

जाणून घेवूया पावसाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी ७ सुपरफूड्सविषयी...

आले.. अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणांनी भरपूर असलेले आले हंगामी आजारांपासून वाचवण्यास मदत करते. घशाच्या खवखवीपासून आराम देते.

पावसाळ्याच्या दिवसांत लसूण हा एक उत्तम सुपरफूड ठरतो. यातील 'ॲलिसिन' नावाचे तत्व संसर्गाशी (इन्फेक्शन) लढण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

मोसंबी, लिंबू, आवळा यांसारखी व्हिटॅमिन 'C' युक्त फळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

तुळशीचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती संतुलित राहते. तुम्‍ही नेहमीच्या चहात तुळशीची पाने टाकून किंवा तुळशीचा काढा बनवून घेऊ शकता.

हळदीमधील 'कुरकुमीन' हे शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत करण्यास मदत करते.

दही हे प्रोबायोटिक्सचा चांगला स्त्रोत आहे, त्‍यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. पावसाळ्यात दुपारच्‍या जेवणात दह्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

शेवग्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, आयर्न, कॅल्शियम आणि शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरतात.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.