पुढारी वृत्तसेवा
रात्री झोपण्यापूर्वी वेलची खा
हा छोटासा मसाला शरीरासाठी ठरू शकतो ‘गेमचेंजर’; मिळू शकतात जबरदस्त फायदे
रात्री वेलची चघळल्याने पोट हलकं राहतं
गॅस, अॅसिडिटी, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. विशेषतः रात्री उशिरा जेवल्यानंतर फायदेशीर
तोंडाचा वास कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय
वेलचीतील नैसर्गिक तेलं तोंडातील बॅक्टेरिया कमी करतात. त्यामुळे सकाळी दुर्गंधीची समस्या कमी होऊ शकते.
तणाव कमी, झोप शांत
वेलचीतील घटक मन शांत ठेवण्यास मदत करतात. बेचैनी आणि ताण कमी होऊन चांगली झोप लागू शकते.
शरीरातील घाण बाहेर टाकण्यास उपयोगी
वेलची शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करू शकते. त्यामुळे शरीर फ्रेश आणि हलकं वाटू शकतं.
नाक बंद, खोकला किंवा श्वासाचा त्रास?
वेलची श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे रात्री आरामदायी झोप मिळू शकते.
ब्लड शुगरसाठीही ठरू शकते उपयुक्त
काही अभ्यासांनुसार, वेलची मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य मिळू शकते.
पचनसंस्थेला आराम
वेलचीतील गुणधर्म पोटातील गोळे, अस्वस्थता आणि जडपणा कमी करण्यास मदत करतात.
आतून निरोगी, बाहेरून ग्लोइंग!
अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते आणि त्वचेलाही फायदा होऊ शकतो.
दररोज 1 वेलची पुरेशी
जास्त प्रमाण टाळा. आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नियमित सेवन करा.