Health Benefits Of Elaichi : चिमूटभर वेलची आहे आरोग्याची खाण; 'हे' १० फायदे वाचून थक्क व्हाल!

पुढारी वृत्तसेवा

वेलची अत्यंत सुगंधी असल्याने ती सर्वोत्तम नॅचरल माउथ फ्रेशनर ठरते.

हिवाळा असो वा पावसाळा, खोकला आणि दम्याचा त्रास होत असल्यास वेलची, खजूर आणि द्राक्ष मधात एकत्र करून खाल्ल्याने आराम मिळतो.

वैज्ञानिकदृष्ट्या वेलची जठराची शिथिलता दूर करून यकृत आणि पित्ताचा स्राव योग्य ठेवते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते.

पोट फुगणे किंवा पोटातील गॅस (आध्मान) आणि उदरशूळ या त्रासांवर वेलची गुणकारी आहे. ही शरीरातील वातदोष कमी करण्यास मदत करते.

प्रवासात किंवा अजीर्णामुळे जीव घाबरत असेल किंवा उलट्या होत असतील, तर वेलचीचे चूर्ण किंवा वेलची तेल डाळिंबाच्या सरबतातून घेतल्यास उलट्या लगेच थांबतात.

आयुर्वेद आणि युनानी मतानुसार, वेलची कफ आणि पित्त विकारांवर अत्यंत प्रभावी आहे. वेलचीचे दाणे, सैंधव, तूप आणि मध यांचे मिश्रण कफविकार दूर करते.

छोटी कागदी वेलची ही हृदयासाठी अत्यंत गुणकारी (हृद्या) मानली जाते. याचे नियमित आणि मर्यादित सेवन हृदयाला कार्यक्षम ठेवण्यास मदत करते.

लघवी करताना त्रास होणे या विकारांवर वेलची उत्तम औषध आहे. वेलचीचे चूर्ण मधासोबत घेतल्याने लघवी साफ होण्यास मदत होते.

युनानी शास्त्रानुसार, वेलचीमध्ये असे सुगंधी गुणधर्म आहेत जे मनाला ताजेतवाने करतात आणि मानसिक प्रसन्नता देण्याचे काम करतात.

वेलचीचे दाणे आणि इतर काही वनस्पतींचे मिश्रण एकत्र करून पाणी आटेपर्यंत उकळून प्यायल्याने सर्व प्रकारचा ताप आणि अजीर्णज्वर बरा होण्यास मदत होते.

येथे क्‍लिक करा.