Black Raisins Benefits: काळ्या मनुक्याचे ८ फायदे... मात्र खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Anirudha Sankpal

रक्तवाढीसाठी उपयुक्त

काळ्या मनुकांमध्ये 'आयर्न' भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास आणि अ‍ॅनिमिया दूर करण्यास मदत होते.

केस गळतीवर नियंत्रण

मनुकांचे नियमित सेवन केल्यास केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.

मूत्रविकारांवर गुणकारी

लघवीची जळजळ होणे किंवा लघवी पिवळी होणे यांसारख्या समस्यांवर मनुकांचे पाणी अत्यंत प्रभावी ठरते.

पित्तशामक आणि थकवा दूर करणारे

अंगावर पित्त उठणे किंवा वारंवार थकवा जाणवत असल्यास मनुका शरीराला थंडावा आणि ऊर्जा प्रदान करतात.

Detox Water कसे बनवावे

१ कप पाण्यात ५ मनुका, प्रत्येकी पाव चमचा धने-जिरे-बडीशेप पावडर आणि खडीसाखर रात्रभर भिजत घालावी.

सेवनाची पद्धत

सकाळी हे मिश्रण गाळून रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स (शुद्ध) होते.

खोकला आणि कफ निवारण

सुका खोकला किंवा घशात खवखव होत असल्यास मनुका, तूप आणि सैंधव मीठ तव्यावर परतून चावून खाव्यात.

पचन सुधारते

मनुका या 'सारक' (Laxative) असल्याने पोट साफ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे पिंपल्सचा त्रासही कमी होतो.

विशेष टीप

मनुका नेहमी पाण्यात भिजवून खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते.

येथे क्लिक करा