पुढारी वृत्तसेवा
केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर 'तमालपत्र' (तेजपत्ता) अनेक आजारांवर गुणकारी औषध म्हणून ओळखले जाते.
अपचन, पोटदुखी आणि वारंवार होणाऱ्या जुलाबाच्या त्रासावर तमालपत्राचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो.
तमालपत्राच्या वापराने शरीरातील कफदोष दूर होतो. लहान मुलांच्या कफजन्य आजारांवरही हे सुरक्षित मानले जाते.
तमालपत्राचा काढा प्यायल्याने शरीरात घाम येऊन ताप रोखण्यास मदत होते.
गर्भधारणा सुरळीत होण्यासाठी आणि गर्भाशयाचे विकार दूर करण्यासाठी तमालपत्र गुणकारी आहे.
तमालपत्राची साल, पिंपळी चूर्ण, आल्याचा रस आणि मध एकत्र चाटल्यास श्वास घेण्याच्या त्रासात मोठा दिलासा मिळतो.
सांधेदुखी आणि सुजेची समस्या असल्यास तमालवृक्षाच्या सालीच्या चूर्णाचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.
तमालवृक्षाच्या सालीचे चूर्ण प्रमेहावर (मधुमेह/Diabetes) गुणकारी मानले जाते.
युनानीच्या मते तमालपत्र यकृत (Liver), प्लीहा आणि मस्तक पोषणासाठी हितकारक असून मूत्रवृद्धीस मदत करते.
संशोधनानुसार, तमालपत्र स्वेदल, मूत्रल, कफघ्न व मलशुद्धी करणारे आहे.