पुढारी वृत्तसेवा
घरगुती औषध म्हणून ओव्याचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातोय. हा छोटासा ओवा आरोग्यासाठी मोठा गुणकारी आहे!
ओवा हा पाचक, तीक्ष्ण, जठराग्नी प्रदीप्त करणारा आणि पोटाचे विकार दूर करणारा मानला जातो.
पचन, जुलाब, मुरडा आणि गॅस अशा त्रासांवर ओवा खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
आयुर्वेदानुसार, जखम किंवा व्रण सडू नये म्हणून ओवा हा प्रतिबंधात्मक आणि उत्तम नैसर्गिक औषध म्हणून काम करतो.
ओव्याची पूड कोमट पाण्यासोबत घेतल्याने सर्दी आणि खोकला झटपट बरा होतो.
गरम पाण्यासोबत ओवा किंवा त्याचा अर्क घेतल्याने श्वासाचा जोर शांत होतो, तसेच फुफ्फुसातील कफ कमी होण्यास मदत होते.
ओवा खाल्ल्याने बाळांतिणीची भूक वाढते, अन्न पचते, कंबरदुखी कमी होते .
ओव्याच्या फुलाचे सेवन केल्याने आतड्यांमध्ये होणाऱ्या कृमींच्या (जंतांच्या) वाढीला प्रतिबंध बसतो.
ओवा नेहमी नवीनच वापरावा, कारण जुन्या ओव्यातील गुणकारी तेल उडून जाते. तसेच ओव्याचा काढा जास्त उकळू नये!