Bitter gourd | दररोज कारले खा: रक्तदाब-मधुमेह, कर्करोगाविरोधात ठरेल फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, तंतुमय घटक (फायबर), लोह आणि इतर पोषक तत्त्वांनी भरलेले कारले अनेक आरोग्यदायी गुणांनी युक्त आहे

काकडी कुलातील उंचवट्यांच्या सालाचे हिरवे फळ पारंपरिकरित्या रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते

कारल्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असलेले काही घटक आढळतात. पोट, मोठे आतडे (कोलन), फुफ्फुसे आणि नासोफॅरिंक्स येथील कर्करोग पेशी नष्ट करते

स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत करून कर्करोग पेशींचा नाश करण्यास सहाय्य करते

शरीरातील ऊतींमध्ये साखरेचा योग्य वापर सुधारते आणि इन्सुलिन या रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रवण वाढवते

अतिप्रमाणात सेवन करणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याविना कारल्याचे पूरक म्हणून सेवन करणे धोकादायक, दुष्परिणाम निर्माण करू शकते गर्भवतींनी दररोज कारले खाणे टाळावे

मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल, तर दररोज कारले खाल्ल्याने साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते

उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) नियंत्रित ठेवण्यासाठी कारले पूरक उपचार म्हणून वापरले जाते

कारले वजन कमी करण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय मानले जाते. कॅलरीज अत्यल्प प्रमाणात असून फायबरसारखे आरोग्यदायी पोषक घटक असतात

येथे क्लिक करा