कॅटरिना कैफने केवळ बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर घडवलं नाही, तर तिच्या सौंदर्याने व अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत..'बार्बी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी कॅटरिना आज १६ जुलै रोजी तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे..कॅटरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. तिचं बालपण अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये गेलं आणि शेवटी ती लंडनमध्ये स्थायिक झाली..तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी मुस्लिम तर आई सुसान टर्कोट ही ब्रिटिश नागरिक आहेत..कॅटरिनाच्या लहानपणीच तिचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर कॅटरिना आणि तिच्या भावंडांचा सांभाळ आईने केला..आई एक वकील व सामाजिक कार्यकर्ती होती. घटस्फोटानंतर कॅटरिनाचे वडील अमेरिकेला गेले आणि त्यानंतर कॅटरिनाची त्यांच्याशी पुन्हा कधीच भेट झाली नाही..कॅटरिना अनेक वेळा सांगते की तिच्या यशामागे तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. आईच्या आधारामुळे ती आज इथपर्यंत पोहोचली आहे, असं ती आवर्जून सांगते..कॅटरिनाचं कुटुंब मोठं आहे. तिला तीन मोठ्या बहिणी, तीन धाकट्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे..कॅटरिनाने केवळ १४ व्या वर्षी मॉडेलिंगच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये ‘Boom’ या चित्रपटातून तिला बॉलिवूडमध्ये पहिले काम मिळाले..तिला खरी ओळख 2005 मध्ये ‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटातून मिळाली. सलमान खानसोबत ती झळकली..खरंच काहीतरी खास..., धडक 2 च्या ट्रेलरनंतर त्रिप्ती डिमरीने शेअर केले फोटो