Hangover and Exercise : ‘हँगओव्हर’साठी व्यायाम पर्याय आहे का?

पुढारी वृत्तसेवा

३१ डिसेंबरच्‍या रात्री सेलिब्रेशनच्‍या नावाखाली काहींना मद्यपानाचा डोस जरा जास्तच होतो.

झगमगाटी रात्रीनंतर नववर्ष उजाडते ते नकोसा पाहुणा ‘हँगओव्हर’नेच.

व्यायाम आणि हँगओव्हर यावर खूप कमी संसोधन झालेले आहे. हँगओव्‍हरचा खेळाडूंच्या कामगिरीवर कसा परिणाम होऊ शकतो, यावर संशोधन झाले आहे.

नियमित व्यायाम करणार्‍यांना हँगओव्हरच्या त्रास तुलनेने कमी होतो; मात्र हँगओव्हर असताना केलेला व्‍यायामाचे दुष्‍परिणाम होवू शकतात, असे या संशोधनात स्‍पष्‍ट झाले.

हँगओव्हरचा त्रास झाल्यास सौम्य व्यायाम करावा. थोडावेळ चालल्याने रक्ताभिसरण सुधारेल आणि उत्साह वाटत असल्‍याचेही संसोधनात स्‍पष्‍ट झाले.

हँगओव्हर असताना कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्यापूर्वी पुरेसे पाणी पिणे आणि इलेक्ट्रोलाइट्स घेणे लाभदायक ठरते.

हँगओव्हरचा त्रास होत असेल तर हलके स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो.

हँगओव्हर ‘घाम गाळून’ घालवण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. त्‍यामुळे हँगओव्‍हरचा त्रास असेल तर व्‍यायाम टाळाच, असे संशोधन सांगते.

येथे क्‍लिक करा.