पुढारी वृत्तसेवा
वारंवार हॅन्डवॉशचा वापर हानिकारक?
स्वच्छतेसाठी हात धुणे गरजेचे असले तरी, सतत हॅन्डवॉश वापरल्याने त्वचेच्या नैसर्गिक तेलावर परिणाम होऊ शकतो.
त्वचा कोरडी पडण्याची भीती
हॅन्डवॉशमधील रसायनांमुळे हातांची त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ शकते, ज्यामुळे खाज सुटण्याची शक्यता असते.
त्वचेची जळजळ आणि रॅशेस
जास्त प्रमाणात फेस येणाऱ्या उत्पादनांमुळे काहींना त्वचेवर लाल रॅशेस किंवा जळजळ जाणवू शकते.
नैसर्गिक बॅक्टेरिया नष्ट होतात
सततच्या वापरामुळे हातांवरील 'चांगले बॅक्टेरिया' देखील नष्ट होतात, जे आपल्या त्वचेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असतात.
हॅन्डवॉशमधील रसायने तपासा
तुमच्या हॅन्डवॉशमध्ये 'ट्रायक्लोसन' किंवा 'पॅराबेन्स' सारखी घातक रसायने तर नाहीत ना? याची नक्की खात्री करा.
मॉइश्चरायझरचा वापर करा
हात धुतल्यानंतर त्वचा कोरडी होऊ नये म्हणून सौम्य मॉइश्चरायझर किंवा हँड क्रीम लावणे विसरू नका.
नैसर्गिक पर्यायांचा विचार करा
शक्य असल्यास केमिकलमुक्त किंवा हर्बल हॅन्डवॉशचा वापर करा, ज्यामुळे त्वचेचे नुकसान कमी होईल.
योग्य पद्धत फॉलो करा
प्रत्येक ५ मिनिटांनी हात धुण्यापेक्षा, जेवणापूर्वी किंवा बाहेरून आल्यावरच हात धुण्याची सवय लावा.