पुढारी वृत्तसेवा
हाफ एग ऑम्लेट हे चवीला उत्तम असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
अंडी पूर्ण न शिजवता अर्धवट शिजवल्याने त्यातील नाजूक पोषक घटक टिकून राहतात
व्हिटॅमिन 'ए', 'डी', बी-कॉम्प्लेक्स घटक, अँटीऑक्सिडंट्स जशाच्या तसे मिळतात.
पिवळ्या बलकात Choline हा घटक असतो, जो मेंदूची कार्यक्षमता वाढवतो.
'ल्यूटेन', 'झेक्सॅन्थिन' हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी मदत करतात.
अर्धवट शिजवलेले एग फ्रायमध्ये 'हेल्दी फॅट्स' सुरक्षित राहतात
जी HDL पातळी वाढवण्यास मदत करतात
हाफ फ्राय ऑम्लेटमधून शरीराला सहज पचणारे आणि उच्च दर्जाचे प्रोटीन मिळते
जे वर्कआउट करतात, त्यांच्यासाठी हा एक चांगला आहार मानला जातो.
अंड्याचे पिवळे बलक व्हिटॅमिन 'डी' युक्त असून हाडे मजबूत होण्यास मदत होते