हळद रुसली कुंकू हसलं मालिका भेटीला आलीय .शेतकरी असल्याचा प्रचंड अभिमान असणारी कृष्णा यामध्ये दिसतेय.तर दुसरीकडे खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असणारा दुष्यंतही आहे.या दोघांची भेट होते खरी पण ही नव्या नात्याची सुरुवात असेल का? .समृद्धी म्हणाली-'दोन अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत आले .'कृष्णाच्या निमित्ताने खूप गोष्टी नव्याने शिकता येणार आहेत'.'कृष्णा थोडी वेगळी असून कोल्हापुरच्या मातीत वाढलीय'.'शिकलेली नसली तरी शेतीचं ज्ञान अवगत आहे, माझा लूकही वेगळा आहे'.'त्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा शिकतेय'.'नो मेकअप लूक आहे असं म्हटलं तरी चालेल'.मन धागा धागा जोडते मालिकेनंतर अभिनेता अभिषेक रहाळकर पुन्हा भेटीला आलाय.कोण आहे 'कांतारा : २' ची अभिनेत्री सप्तमी गौडा? ऋषभ शेट्टी सोबत झळकणार