shreya kulkarni
आजकाल तरुण वयातच लोकांना टक्कल पडू लागले आहे. यामागे केवळ आनुवंशिक कारणे नसून, अनेक बाह्य घटकही जबाबदार आहेत.
जास्त मानसिक ताणामुळे 'कोर्टिसोल' नावाचा हार्मोन वाढतो. यामुळे केसांची वाढ थांबते आणि ते गळायला लागतात.
केसांना जास्त प्रमाणात रंग, ब्लीच लावल्याने किंवा ड्रायर आणि सिरमचा अतिवापर केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि ते तुटू लागतात.
केसांना जास्त वेळ कृत्रिम केसांचे वजन दिल्याने नैसर्गिक केसांच्या मुळांवर ताण येतो आणि ते गळू लागतात.
आहारात प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता असल्यास केसांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो.
धूळ, धूर आणि प्रदूषणातील रसायनांमुळे केस कमकुवत होऊन गळायला लागतात.
तुमच्या आहारात बायोटिन असलेले पदार्थ जसे की अंडी, सुका मेवा, अक्रोड, सी-फूड, डाळी आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
केसगळती थांबवण्यासाठी योग्य आहार घ्या, तणाव कमी करा आणि नैसर्गिक तेलांचा वापर करा.