पुढारी वृत्तसेवा
कडक उन्हाचा तडाखा
वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णता वाढणे सामान्य असले तरी, अनेकदा आपल्या काही चुका याला कारणीभूत ठरतात.
पुरेशा पाण्याचे सेवन न करणे
दिवसातून कमीत कमी ७-८ ग्लास पाणी न प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक थंडावा कमी होतो आणि उष्णता वाढते.
मसालेदार पदार्थांचे अतिसेवन
जेवणात जास्त तिखट, तेलकट आणि गरम मसाल्यांचा वापर केल्याने शरीराचे तापमान आतून वाढू लागते.
कॅफीनचे अतिप्रमाण
चहा आणि कॉफीचे अतिसेवन शरीराला डिहायड्रेट करते, ज्यामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो.
घट्ट आणि सिंथेटिक कपडे
उन्हाळ्यात नायलॉन किंवा घट्ट कपडे घातल्याने त्वचेला हवा मिळत नाही आणि शरीरातील गरम हवा कोंडून राहते.
पुरेशी झोप न मिळणे
सततची जागरणे किंवा अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील पित्त वाढते आणि पर्यायाने 'बॉडी हीट' वाढू लागते.
अतिव्यायाम किंवा कष्टाचे काम
क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने स्नायूंमध्ये उष्णता निर्माण होते, जी बाहेर न पडल्यास त्रासदायक ठरते.
व्यसनांचा परिणाम
मद्यपान किंवा धूम्रपानामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण होते.