पनीर खाण्याची आवड महागात पडू शकते; 'या' लोकांनी अजिबात पनीर खाऊ नये

पुढारी वृत्तसेवा

चवीला चविष्ट आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले पनीर अनेकांच्या आवडीचे असते, मात्र त्याचे अतिसेवन आरोग्याला घातक ठरू शकते.

ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी (Lactose Intolerance) आहे, त्यांनी पनीर खाणे टाळावे, अन्यथा पोटाचे विकार वाढतात.

पनीरमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असल्याने, ज्यांचे वजन आधीच जास्त आहे त्यांनी याचे मर्यादित सेवन करावे.

Weight | Weight

हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी पनीर खाताना काळजी घ्यावी, कारण यामुळे सोडिअमची पातळी वाढू शकते.

BP control diet

पचनसंस्था कमकुवत असलेल्या लोकांसाठी पनीर पचायला जड असते, ज्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Digestive power

किडनीशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पनीर खाऊ नये, कारण यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.

kidney health tips | file photo

रात्रीच्या वेळी पनीरचे सेवन केल्याने अनेकदा छातीत जळजळ किंवा ॲसिडिटी होण्याची शक्यता असते.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, त्यामुळे संतुलित प्रमाणात पनीर खाणेच आरोग्यासाठी हिताचे ठरते.

येथे क्लिक करा...