पुढारी वृत्तसेवा
वाढत्या वयानुसार शरीराची ताकद, लवचिकता आणि चयापचय क्रिया बदलते. त्यामुळे प्रत्येक वयोगटात जिम वर्कआउटचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो.
'अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन'च्या संशोधनानुसार, वयाच्या ३० नंतर दर दशकात ३ ते ८ टक्के स्नायू कमी होतात. नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंगने ही प्रक्रिया रोखता येते.
वयाच्या २० ते ३० व्या वर्षांपर्यंत शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन्स उच्च पातळीवर असतात. या वयात हेव्ही लिफ्टिंग आणि हाय-इंटेन्सिटी वर्कआउटमुळे स्नायूंचा विकास वेगाने होतो.
वयाच्या तिशीनंतर मेटाबॉलिझम मंदावण्यास सुरुवात होते. या वयात वजनाचे व्यायाम आणि कार्डिओचा समतोल राखल्यास शरीरातील चरबी नियंत्रित राहते आणि हाडांची घनता टिकून राहते.
चाळीशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होऊ लागते. या वयात जिममध्ये जास्त वजनांऐवजी योग्य फॉर्म, कोर स्ट्रेंथ आणि मोबिलिटी व्यायामावर भर देणे गरजेचे असते.
जिममधील हलके स्ट्रेंथ ट्रेनिंग हाडांचे संरक्षण करते आणि शरीराचा समतोल (Balance) सुधारून पडण्यामुळे होणाऱ्या दुखापतींचा धोका टाळतो.
'ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन'नुसार, आठवड्यातून ६० ते ७० मिनिटे स्ट्रेंथ ट्रेनिंग करणाऱ्यांमध्ये अकाली मृत्यूचा धोका १० ते २० टक्क्यांनी कमी होतो.
वाढत्या वयानुसार जिम वर्कआउटनंतर स्नायूंना पूर्ववत होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे वयानुसार व्यायामादरम्यान योग्य विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जिमचा व्यायाम हा कोणत्याही वयात फायदेशीर ठरतो; मात्र वय, वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक क्षमतेनुसार प्रमाणित ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच वर्कआउट प्लॅन ठरवावा.
टीप: प्रत्येकाची शारीरिक क्षमता आणि वैद्यकीय इतिहास वेगळा असतो; त्यामुळे कोणताही वर्कआउट प्लॅन सुरू करण्यापूर्वी सर्टिफाइड ट्रेनर किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.