Rahul Shelke
भारतामध्ये बंदूक किंवा इतर शस्त्र ठेवायचं असेल, तर गन लायसन्स असणं बंधनकारक आहे. याचे नियम खूप कडक आहेत.
भारतात सामान्य नागरिकाला कायदेशीररित्या जास्तीत जास्त 2 शस्त्र ठेवण्याची परवानगी आहे.
पूर्वी एका व्यक्तीकडे 3 शस्त्र ठेवण्याची परवानगी होती. पण नंतर नियम बदलण्यात आला.
शस्त्रांचा गैरवापर आणि साठेबाजी रोखण्यासाठी 2019 मध्ये नियम बदलला आणि लिमिट 3 वरून 2 करण्यात आली.
नाही. भारतात एकच लायसन्स दिलं जातं. त्या एकाच लायसन्समध्ये तुमची दोन्ही शस्त्रांची नोंद केली जाते.
गन लायसन्सला युनिक आयडी नंबर असतो. म्हणजे एका व्यक्तीसाठी एकच अधिकृत रेकॉर्ड ठेवला जातो.
नियम बदलण्याआधी 3 शस्त्र असतील, तर तिसरं शस्त्र किंवा लायसन्स्ड डीलरकडे द्यावं लागतं किंवा पोलीस ठाण्यात जमा करावं लागतं.
तिसरं शस्त्र जमा केलं नाही, तर लायसन्स रद्द होऊ शकतं आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते.
गन लायसन्ससाठी: वय किमान 21 वर्ष, क्रिमिनल रेकॉर्ड स्वच्छ, मानसिकदृष्ट्या फिट, कारण योग्य असावं (स्वसंरक्षण/शेती संरक्षण/स्पोर्ट्स शूटिंग)
वारशातून शस्त्र मिळालं तरी 2 शस्त्रांचा नियम लागू होतो. फक्त राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील शूटर्सना काही प्रकरणांत जास्त शस्त्रांची परवानगी मिळू शकते.