Green Peas Peel Soup: मटारचे टरफल फेकून देताय... थांबा जाणून घ्या पौष्टिक सूप कसा करायचा

Anirudha Sankpal

बाजारात मिळणारी हिरवी मटार चवीला उत्तम असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जाते.

अनेक घरांमध्ये मटारचे दाने भाजीसाठी वापरले जातात आणि त्याचे वरचे छिलके (टरफले) कचरा समजून फेकून दिले जातात.

परंतु, ज्या छिलक्यांना आपण निरुपयोगी समजतो, त्यापासून महागड्या सप्लीमेंट्सला टक्कर देणारे पौष्टिक सूप बनवता येते.

मटारच्या छिलक्यांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि यात मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात.

या सूपच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारे 'व्हिटॅमिन बी' आणि 'व्हिटॅमिन सी' सारखे अनेक जीवनसत्त्वे सहज मिळतात.

सूप बनवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये भिजवलेले छिलके, थोडे मटार दाणे, बटर, दूध आणि पाणी एकत्र करून ४ शिट्ट्या काढून घ्याव्यात.

हे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यावे आणि नंतर बारीक गाळणीने छान गाळून घ्यावे.

शेवटी कढईत हे मिश्रण काढून त्यात चवीनुसार मीठ व काळी मिरी पावडर टाकावी आणि एक उकळी काढताच पौष्टिक सूप तयार होते.

येथे क्लिक करा