Green peas benefits : हिरवा वाटाणा आहे आरोग्याचा खजिना; जाणून घ्या फायदे

Asit Banage

पचनक्रिया सुधारते

हिरव्या वाटाण्यातील भरपूर फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत

फायबर आणि प्रथिनांमुळे जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी वाढ नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

मटारमधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

वजन नियंत्रणास मदत

प्रथिने आणि फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.

डोळ्यांसाठी उपयुक्त

हिरव्या वाटाण्यातील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

प्रथिनांचा चांगला स्रोत

मटारमध्ये वनस्पतीजन्य प्रथिने असल्याने स्नायू आणि शरीराच्या पोषणासाठी त्याचा आहारात समावेश करता येतो.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी मदत

मटारमध्ये व्हिटॅमिन सीसह विविध जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्स आढळतात.

पोषक घटकांचा खजिना

हिरवा वाटाणा हा फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत असून संतुलित आहाराचा भाग बनू शकतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...