पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेदानुसार सर्व कडधान्यांमध्ये 'हिरवा मूग' हा सर्वात गुणकारी मानला जातो. म्हणूनच चरक आणि सुश्रुत ऋषींनीही याची प्रशंसा केली आहे.
आजारपणात शरीराला ताकद देण्यासाठी आणि वात-पित्त-कफ दूर करण्यासाठी मुगाचे पाणी अत्यंत गुणकारी ठरते.
आजारी माणसासाठी किंवा हलकं-फुलकं खाण्याची इच्छा असल्यास 'मुगाची मऊ खिचडी' हा सर्वात उत्तम आणि पचायला हलका पर्याय आहे.
थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारे आणि पौष्टिकतेने भरपूर असणारे 'मुगाच्या पिठाचे लाडू' चवीलाही अत्यंत स्वादिष्ट असतात.
मूग हे काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल अशा विविध रंगांत आढळतात. मटकीपेक्षा ते कमी वातूळ असतात.
जेथे दूध चालत नाही अशा नव्या त्रिदोष तापात रुग्णाला मुगाचे पाणी लाभदायक ठरते. ताप उतरल्यावरही हे पाणी शरीराला नवशक्ती देते.
भाजलेल्या मुगाच्या काढ्यात मुरमुरे, मध आणि साखर घालून प्यायल्याने उलट्या लगेच थांबतात. अतिसारावरही हा काढा गुणकारी आहे.
मूग वाफवून त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे.
आयुर्वेदानुसार, मूग हे रुक्ष, हलके, कफ-पित्तनाशक, थंड, मधुर आणि डोळ्यांसाठी हितकारक आहेत.
मुगापासून फक्त आमटी किंवा खिचडीच नाही, तर वर्षभर टिकणारे कुरकुरीत पापड आणि चवदार सांडगेही बनवले जातात.