Liver Health : रोज कॉफी पिण्याने यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या नवीन संशोधन

पुढारी वृत्तसेवा

कॉफी पिण्यामुळे यकृताचे आजार कमी होऊ शकतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.

'क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपेटॉलॉजी' जर्नलनुसार, कॉफीच्या सेवनाचा थेट संबंध यकृताचे आरोग्य सुधारण्याशी आहे.

'यूके बायोबँक' (UK Biobank) मधील ३.५ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या आरोग्याचा तब्बल १३ वर्षे अभ्यास करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.

'यूके बायोबँक' च्या डेटाचा अभ्यास केला असता, दिवसातून ५ किंवा अधिक कप कॉफी पिणाऱ्यांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा धोका ४७% कमी आढळला.

कॉफी पिणाऱ्यांच्या रक्तातील घटकांचा अभ्यास करून 'क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपेटॉलॉजी' ने स्पष्ट केले की, यामुळे यकृताची सूज आणि चरबी कमी होते.

दोन्ही प्रकारच्या कॉफी फायदेशीर! कॉफीचे फायदे केवळ कॅफिनमुळेच नसून इतर घटकांमुळेही मिळतात, असे 'यूके बायोबँक' च्या संशोधनात दिसले.

संशोधनानुसार, दिवसातून ३ ते ४ कप कॉफी पिणाऱ्यांमध्ये सर्वात चांगले परिणाम दिसले, तर १ ते २ कप पिणाऱ्यांनाही याचा फायदा होतो.

"कॉफी पचत असल्यास मर्यादित सेवन उत्तम, पण केवळ यकृत रक्षणासाठी नवीन सवय लावू नका," असा सल्ला अभ्यासक जू डोंग यांग यांनी दिला आहे.

केवळ कॉफीवर अवलंबून न राहता वजन नियंत्रण, व्यायाम आणि दारूचे मर्यादित सेवन यकृतासाठी आवश्यक असल्याचे संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे.

तज्ज्ञांच्या मते दिवसाला ४०० मिग्रॅ (अंदाजे ४ कप) कॅफिन सुरक्षित आहे. जास्त सेवनाने उच्च रक्तदाब आणि अस्वस्थता वाढू शकते.

येथे क्‍लिक करा.