पुढारी वृत्तसेवा
गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्य यांनी इंस्टाग्राम पोस्टमधून हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.
भारतीय जेवणाची खरी चव मसाल्यांच्या ठसक्यात असते. आरोग्याच्या दृष्टीने हिरवी मिरची अधिक फायदेशीर मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, पातळ आणि तिखट हिरवी मिरची अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते.
हिरवी मिरचीमध्ये विटॅमिन सी उच्च पातळीवर असते. ते शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करते. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत होते.
विटॅमिन सीमुळे शरीराला अन्न घटकांमधून लोह (आयरन) शोषून घेणे सोपे जाते. यामुळेच डाळ किंवा भाजीसोबत हिरवी मिरची खाल्ल्याने आयर्नचे शोषण उत्तम होते.
'कॅप्साइसिन' घटकामुळे हिरवी मिरचीला येणारा तिखटपणा मिळतो. हा कंपाउंड शरीरातील ऊर्जा वापरण्याची क्षमता (एनर्जी एक्सपेंडिचर) वाढवण्यास हातभार लावतो.
हिरवी मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीनसारखे महत्त्वाचे कॅरोटीनॉइड्स असतात. हे घटक शरीरात गेल्यावर विटॅमिन ए मध्ये रूपांतरीत होतात.
हिरवी मिरचीचे अतिसेवन टाळावे. विशेषतः पचनशक्ती कमजोर असणाऱ्यांनी जास्त तिखट खाल्ल्यास ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटात त्रास होऊ शकतो.
दररोजच्या जेवणात हिरव्या मिरचीचा वापर भाजी, डाळ, चटणी किंवा सॅलडमध्ये करून तुम्ही आरोग्याला निरोगी ठेवू शकता, फक्त प्रमाणाचे भान ठेवा!