The Great Pyramid of Giza | गिझाच्या ग्रेट पिरॅमिडची थक्क करणारी रहस्ये!

Namdev Gharal

गिझाचा महाकाय पिरॅमिड (The Great Pyramid of Giza) हा जगातील सात आश्चर्यांपैकी सर्वात जुना आणि आजही दिमाखात उभा असलेले एकमेव बांधकाम आहे.

हा महाकाय पिरॅमिड इजिप्तचा राजा खुफू Khufu याने साधारण ४,५०० वर्षांपूर्वी बांधला होता. हे बांधकाम पूर्ण व्हायला साधारण २० वर्षांचा काळ लागला असावा असा अंदाज आहे.

अवाढव्य आकार : या पिरामीडची मूळ उंची १४६.६ मीटर (४८१ फूट) होती आज ती थोडी कमी झाली आहे. जवळजवळ ३,८०० वर्षांपर्यंत ही जगातील सर्वात उंच मानवनिर्मित वास्तू होती.

हा पिरॅमिड बांधण्यासाठी तब्बल २३ लाख दगडांच्या शिळा वापरल्या गेल्या आहेत. प्रत्येक दगडाचे वजन सरासरी २.५ टन ते ८० टनांपर्यंत आहे

या पिरॅमिडच्या चारही दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या मुख्य दिशांशी इतक्या अचूकपणे जुळतात की आधुनिक Compass गरज भासणार नाही.

बाहेर वाळवंटात तापमान जरी ४०-५० अंश सेल्सिअस असले, तरी पिरॅमिडच्या आतले तापमान नेहमी स्थिर २० अंश सेल्सिअस असते. हे निसर्गाचे आणि इजिप्शियन तंत्रज्ञानाचे एक मोठे गुपित आहे.

गिझाचे तीनही पिरॅमिड आकाशातील Orion's Belt या नक्षत्रसमूहातील तीन ताऱ्यांच्या रेषेत तंतोतंत जुळतात. प्राचीन इजिप्शियन लोकांना खगोलशास्त्राचे किती सखोल ज्ञान होते, याचे हे प्रतीक आहे.

पिरॅमिडच्या दगडांना जोडण्यासाठी वापरलेले सिमेंट इतके मजबूत आहे की आजही शास्त्रज्ञ त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करू शकलेले नाहीत. हे नैसर्गिक खडकापेक्षाही जास्त कठीण आहे.

पिरॅमिडमध्ये आजही अशी अनेक गुप्त भुयारे आणि चेंबर्स आहेत जिथपर्यंत आजही मानव पोहोचू शकलेला नाही.

राजाचा कक्ष आणि राणीचा कक्ष यांच्याशिवाय एक 'बिग व्हॉईड' नावाचा मोठा रिकामा भाग अलीकडेच स्कॅनिंग तंत्रज्ञानाद्वारे शोधला गेला आहे, जे अजूनही एक मोठे रहस्य आहे.

cleopatra