Namdev Gharal
जगातील सुंदर स्त्री असलेली इजिप्तची राणी हिच्या भोवती आजही गूढ कायम आहे. २,००० वर्षांनंतरही क्लिओपात्राचे हे 'ब्युटी सीक्रेट्स' जगाला थक्क करतात.
क्लिओपात्रा जितकी सुंदर होती तितकीच हुशारही होती इजिप्तवर तिने 21 वर्षे राज्य केले. जगाला वाटतं ती इजिप्शियन होती, पण क्लिओपात्रा मुळात ग्रीक (मॅसेडोनियन) होती
क्लिओपात्रा तिच्या सौंदर्यासाठी दररोज ७०० गाढविणींच्या ताज्या दुधाने स्नान करायची. या दुधामुळे तिची त्वचा नेहमी मऊ आणि चमकदार राहायची. दुधार्तील 'लॅक्टिक ॲसिड' त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.
त्वचेला ओलावा देण्यासाठी ती नैसर्गिक मध आणि कोरफडीचा वापर करायची. हे मिश्रण तिच्या चेहऱ्याला नैसर्गिक चकाकी द्यायचे.
ती तिच्या शरीराच्या स्क्रबरसाठी 'डेड सी' (Dead Sea) मधील मीठ वापरायची. या मिठामध्ये असलेले मुबलक खनिजे त्वचेला टवटवीत ठेवत असत.
क्लिओपात्रा तिचे डोळे अधिक मोठे आणि गडद दिसण्यासाठी खास काजळ लावायची. हे केवळ सौंदर्यासाठी नव्हते, तर उन्हापासून आणि संसर्गापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठीही होते.
क्लिओपात्राला गुलाबाचा सुगंध खूप प्रिय होता. ती तिच्या स्नानाच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकायची आणि शरीराला 'रोझ वॉटर' लावायची, ज्यामुळे तिच्या शरीरातून नेहमी सुगंध दरवळायचा.
रसायनांऐवजी ती ओठांना आणि गालांना रंग देण्यासाठी 'रेड ऑकर' (Red Ochre) नावाच्या नैसर्गिक दगडाच्या पावडरचा वापर करायची.
असे मानले जाते की तिचे खरे सौंदर्य तिच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेत आणि आत्मविश्वासात होते. ती ९ भाषा बोलायची, ज्यामुळे कोणालाही ती सहज प्रभावित करू शकत असे.