Namdev Gharal
हो निसर्गातील अनेक चमत्कारापैकी एक पक्षी म्हणजे Great Frigatebird हा पक्षी होय. अनेक प्रकारे या पक्ष्याचे वेगळेपण समोर येते
Great Frigatebird हा समुद्रावर राहणारा, अत्यंत भव्य आणि वेगळ्या सवयींचा पक्षी आहे. याचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे हा इतका दिर्घकाळ हवेत उडतो की उडता उडता झोप घेतो
हा पक्ष्याने एकदा उडाण भरली की तो सलग ७ दिवस कोठेही न थांबता सलग समुद्रावर उडतो. याकाळात मासे पकडणे व हवेत तो विश्राांती घेतो (शॉर्ट नॅप)
ही ताकद याला त्याच्या पंखामुळे मिळते पंखांची रुंदी ७ ते ८ फूट असते तर पंख वजनाने खूप हलके असतात शरीर सडपातळ असते यामुळे याला हे शक्य होते
जगातील प्रमुख महासागरांवर याचा आढळ असतो. हा जरी समुद्री पक्षी असला तरी याला पोहता येत नाही याचे पंख भिजले की याला परत उडता येत नाही
नराच्या गळ्याखाली लाल फुगणारी पिशवी (Red Gular Pouch) असते जी मादीला आकर्षित करण्यासाठी तो ती फुगवतो. ही दृश्ये अतिशय दुर्मिळ आणि आकर्षक असतात
याला Pirate Bird किंवा दरोडेखोर पक्षीही म्हटले जाते कारण इतर समुद्री पक्ष्यांकडून अन्न चोरण्याची याला सवय असते इतर पक्ष्यांवर हल्ला करून मासा चोचीतून पाडायला भाग पाडतो
समुद्रात जे हवेत उडणारे मासे असतात ते हवेतल्या हवेत तो पकडतो तसेच इतर पक्ष्यांकडून हिसकावलेले अन्न हवेतच झेलता.
हे पक्षी समुद्रकिनाऱ्यावरील झाडांवर घरटी एकावेळी फक्त एकच अंडे घालतात पिल्लाची काळजी १८ महिने घेतात