Namdev Gharal
दुपारी शांततेत,- सकाळी - सकाळी प्रसन्न वातावरणात गल्लीत, अंगणात, घराच्या गच्चीतून येणार चिमणीचा सुंदर कलकलाट बंद झाला आहे
काय घडले असेल की अचानक या चिमण्या गायब का झाल्या आहेत. कोणते घटक कारणीभूत आहेत हे पाहू
यातील सर्वात महत्वाचे कारण आहे मोबाईल टॉवर टॉवर्समधून येणाऱ्या रेडिएशनचा परिणाम चिमण्यांच्या अंड्यांवर होतो. अंडी उबवली जात नाहीत किंवा पिल्ले जगत नाहीत, असे अनेक अभ्यासक सांगतात.
घरटी बांधायला जागाच नाही, पूर्वी कौलारू मोकळी घरे होती—भिंतींमधील कपारी, छपराखाली जागा याठिकाणी चिमण्यांची घरटी बनायची.
आधुनिक रहिवासी टॉवर्स व आरसीसी बांधकामे यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच राहिली नाही
पूर्वी अंगणात धान्य, भात सांडायचे, शेतीमध्ये धान्य पिकांचे उत्पादन अधिक घेतले जायचे पण हे सर्व प्रकारच कमी झाल्यामुळे चिमण्यांची संख्याच रोडावली
पॅक्ड फूड मुळे, बंद स्वंयपाक घरामुळे अन्न सहजपणे उपलब्ध होत नाही, पूर्वी राहिलेले धान्य बाहेर अंगणात टाकले जायचे ते पूर्णपणे बदं झाले आहे
शेतीमध्ये किटकनाशकांचा वापर वाढला. शेती मध्ये सध्या धान्यपिकं कमी झाली आहेत त्यात किटकनाशकांची फवारणी वाढली आहे याचा परिणाम चिमण्याच्यां सख्येवर झाला आहे.
वाढते प्रदूषण आणि तापमान बदल, हवा, आवाज, उष्णता—या सगळ्याचा थेट परिणाम चिमण्यांच्या आरोग्यावर होतो.