Namdev Gharal
सध्या उन्हाळा असल्याने लोक पुढील वर्षभरासाठी लागणारी धान्य खरेदी करत असतात पण याची योग्य पद्धतीने साठवणूक करणेही तितकेच महत्वाचे असते
धान्य वर्षभर सुरक्षित आणि कीडमुक्त ठेवण्यासाठी काही खास टिप्स. यामुळे धान्य वर्षभर चांगले राहू शकते
धान्य साठवण्यापूर्वी ते २-३ दिवस कडक उन्हात चांगले वाळवून घ्यावे. धान्यातील आर्द्रता (ओलावा) निघून गेली की कीड लागण्याची शक्यता कमी होते.
धान्य साठवण्यासाठी हवाबंद डबे किंवा जास्त धान्य असल्यास धातूचे पिंप वापरावे. प्लास्टिकच्या गोण्यांऐवजी स्टीलचे पिंप वापरणे चांगले
धान्यामध्ये कडुनिंबाचा पाला स्वच्छ धुवून आणि सुकवून ठेवावा. कडुनिंबाच्या पानांचा उग्र वास कीड आणि अळीला दूर ठेवतो.
तांदूळ किंवा कडधान्यांमध्ये २-३ तमालपत्रे किंवा काही लवंगा टाकल्यास किडींचा प्रादुर्भाव होत नाही. हा एक नैसर्गिक उपाय आहे.
डाळी किंवा कडधान्यांना साठवण्यापूर्वी थोडे एरंडेल तेल चोळल्यास त्यांना कीड लागत नाही. यामुळे धान्य अधिक काळ ताजे राहते.
सुरवातीला साठवलेल्या धान्याची दर १० - १२ दिवसांनी तपासणी करा. धान्य पुन्हा एकदा उन्हात वाळवल्यास ते अधिक सुरक्षित राहते.
धान्य साठवण्याची जागा कोरडी आणि हवेशीर असावी. ओलावा असलेल्या ठिकाणी धान्य ठेवल्यास बुरशी येण्याची शक्यता असते.
बाजारात धान्यासाठी अनेक रासायनिक औषधांपेक्षा कडुनिंब किंवा लवंग यांसारख्या नैसर्गिक उपायांचा वापर करणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे.