पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक फोटोला कॅप्शन जोडा
फोटो उघडा → वर ‘Add Caption’ वर क्लिक करा.
कॅप्शनमुळे फोटो शोधणे अगदी सोपे होते.
‘Stack Photos’ ऑप्शन सुरू करा
एकसारखे, सलग घेतलेले फोटो Google Photos एकत्र दाखवतो.
हे सेटिंग ON केल्याने गॅलरी खूप नीटनेटकी दिसते.
‘Backup Quality’ मध्ये ‘Storage Saver’ निवडा
स्टोरेज वाचवून जास्त फोटो अपलोड करता येतात.
Google Photos जागा कमी खाण्यासाठी बेस्ट.
‘Locked Folder’ वापरा (Private Photos साठी)
खासगी फोटो किंवा डॉक्युमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी Lock Folder वापरा.
पासकोडशिवाय कुणालाही दिसणार नाही.
‘Face Grouping’ चालू ठेवा
चेहरा ओळखून Google Photos सर्व फोटो गटात ठेवतो.
विशिष्ट व्यक्तीचे फोटो लगेच शोधता येतात.
‘Photos Scan’ अॅपने जुने फोटो डिजिटल करा
घरातील जुने अल्बम स्कॅन करून Google Photos मध्ये सुरक्षित ठेवा.
फोटो खराब होण्याची भीती नाही.
Auto Create: Movies, Collages, Memories वापरा
Google Photos आपोआप सुंदर व्हिडिओ, कोलाज, आठवणी तयार करून देतो.
ट्रिप किंवा सेल्फीजचा झक्कास कलेक्शन मिळतो.
Search Filters वापरा तारीख, जागा, ऑब्जेक्ट
“Beach”, “Food”, “Car”, “Pune 2022” असे लिहिल्यावर फोटो झटक्यात मिळतात.
शोधण्याची धांदल पूर्ण संपते.
Albums Shared करून फॅमिलीसोबत फोटो शेअर करा
एक अल्बम तयार करा आणि कुटुंबासोबत शेअर करा.
त्यात ते देखील फोटो टाकू शकतात फॅमिली मेमरी बँक तयार!