Google birthday 2025: तुम्हाला माहिती आहे का, Google आज किती वर्षाचं झालं?

पुढारी वृत्तसेवा

होय! आज गूगलचा (Google) वाढदिवस आहे. तो आज २७ वर्षांचा झाला आहे.

गॅरेजपासून ग्लोबल टेक हाऊस बनण्यापर्यंतच्या गुगलच्या प्रवासाचा उत्सव आहे.

१९९८ साली लॅरी पेज (Larry Page) आणि सर्गेई ब्रिन (Sergey Brin) यांनी गूगलची स्थापना केली होती.

आज जगभरात कोणतीही माहिती सर्च करण्यासाठी गूगलचा वापर होतो.

गूगलने आपल्या २७ वर्षाच्या प्रवासात अनेक नवीन सेवा सुरू केल्या आहेत.

जीमेल (Gmail), गूगल मॅप्स (Google Maps) आणि अँड्रॉइड (Android) या काही गुगलच्या लोकप्रिय सेवा आहेत.

Google जगभरात सर्वात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिन असून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे.

सध्या सुंदर पिचाई (Sundar Pichai) गुगल आणि अल्फाबेटचे CEO आहेत.

AI, क्लाउड, हार्डवेअर आणि नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कंपनीचे नेतृत्व त्यांच्याच हातात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा