Namdev Gharal
गोल्डन लायन तामरिन हा एक रंगीबेरंगी, लहान माकड आहे जे दक्षिण अमेरिका, विशेषत: ब्राझीलच्या उष्णकटिबंधीय जंगलात आढळते.
त्याच्या चेहऱ्याभोवती असलेल्या सिंहाच्या आयाळीसारखा चमकदार केसांमूळे त्याला हे नाव पडले
गोल्डन लायन तामरिनचे शरीर साधारणतः २५ ते ३० सेंटीमीटर लांब असते आणि त्याचा मागील भाग लांबट असतो
हे एक लहान आकाराचे माकड असते याचे साधारणतः वजन ५५० ते ७५० ग्राम दरम्यानअसते
हे सामाजिक प्राणी असतात, जे ४ ते ८ सदस्यांच्या टोळीमध्ये राहतात, असे अनेक गट असतात
हे तामरिन हे मुख्यतः झाडांवर राहणारे प्राणी आहेत. ते झाडाच्या शेंड्यांवर राहून अन्न शोधतात.
त्यांचा आहार मुख्यतः फळ, कीटक, छोटे प्राणी, तसेच काही वेळा वनस्पतींचे कोमल भाग असतात.
या माकडांची शारीरिक रचना विशेषतः झाडांवर चढण्यासाठी अत्यंत योग्य आहे. त्यांचे लांब पंजे आणि पाऊले झाडांवर पकड घेण्यासाठी उपयुक्त असतात
या माकडाची त्वचा आणि केस इतर प्राण्यांपेक्षा अधिक संवेदनशील असतात