Namdev Gharal
वाळवंटातील गोंडस कोल्हा म्हणून ओळखला जाणारा फेनेक फॉक्स हा जगातील सर्वात लहान कोल्हा आहे.
याचे वास्तव्य प्रामुख्याने सहारा वाळवंटआणि उत्तर आफ्रिका याठिकाणी असते
हा कोल्हा प्रजातील आकाराने सर्वात लहान असतो याची उंची :२० सें.मी. अंदाजे असते वजन : साधारण १.५ ते १.६ किलो असते
हा गोंडस दिसतो कारण याचे कान याचे १५ सेंटीमिटर असतात व याच्या छोटयाशा शरिरावरे उठून दिसतात
मोठे कान आणि लहान शरीर ही त्याची खास ओळख. याची लांबी २४–४१ सें.मी. शेपटीसह असते
त्याच्या मोठया कानांचा वापर वाळवंटातील भयंकर उष्णतेमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी होतो.
हा निशाचर असतो त्यामुहे याला रात्रीचा शिकारी म्हणतात. कीटक, लहान पक्षी, अंडी, वनस्पतींची मुळे, फळे खातो.
याचे आणखी वैशिष्ठय म्हणजे पाण्याविना अनेक दिवस जगण्याची क्षमता.
हे सामाजिक प्राणी असतात लहान गटात राहतात व एकमेकांशी सतत आवाज करून संवाद साधतात.