gold ring astrology |सोन्याची अंगठी चुकीच्या बोटात घालताय? पाहा काय सांगते तुमची रास!

पुढारी वृत्तसेवा

सोने केवळ दागिना नाही, तर नशीब बदलणारा धातू मानला जातो. पण तो योग्य बोटात घालणे गरजेचे आहे.

हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, हाताचे प्रत्येक बोट एका विशिष्ट ग्रहाचे प्रतिनिधित्व करते.

तर्जनीत सोने घालणे गुरु ग्रहाला मजबूत करते. हे सुख-समृद्धी आणि ज्ञानासाठी शुभ मानले जाते.

मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी तर्जनीत सोन्याची अंगठी घालणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

मध्यमेत सोने घालताना काळजी घ्यावी. शनीचा प्रभाव असलेल्या या बोटात सोने सर्वांनाच लाभत नाही.

अनामिका (Ring Finger) हे बोट सूर्याचे आहे. येथे सोने धारण केल्याने कीर्ती, मान-सन्मान आणि आत्मविश्वास वाढतो.

मिथुन, तुळ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना अनामिकेत सोने घालणे भाग्योदयकारक ठरू शकते.

करंगळी हे बुध ग्रहाचे बोट मानले जाते. बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी येथे सोने घातले जाते.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणताही धातू धारण करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञ किंवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.

येथे क्‍लिक करा.