Namdev Gharal
निसर्गात एक असा पक्षी आहे जो चमकणाऱ्या वस्तू चारेतो, यामध्ये कॉइन्स, रिंग इतकेच काय दागिनेसुद्धा असतात. पण हे सत्य आहे का जाणून घेऊ
या पक्ष्याचे नाव आहे मॅगपाय Magpie युरोपियन मॅगपायबद्दल नेक दंतकथा प्रचलित आहेत, त्याच्या घरट्यात सोन्या चांदीच्या वस्तू सापडतात इत्यादी, सोशल मिडीयावरही AI फोटो तयार करुन याबाबत खोटे दावे केले जातात.
भारतामध्ये 'साळुंकी' किंवा 'खंड्या' यांसारख्या पक्ष्यांशी साधर्म्य असणारा मॅगपाय (Magpie) हा पक्षी त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि चपळाईसाठी जगप्रसिद्ध आहे
अनेक कथांमध्ये सांगितले जाते की मॅगपायला चमकणारे दागिने किंवा वस्तू आवडतात. पण संशोधनानुसार हे केवळ एक 'मिथक' किंवा गैरसमज आहे.
मॅगपाय हे खूप जिज्ञासू आणि बुद्धिमान असतात. कधीतरी अन्नाच्या शोधात असताना त्यांनी एखादी चमकदार वस्तू चोचीने उचलली असेल, तर मानवी नजरेला ते 'चोरी' वाटते.
एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात असे आढळले की, मॅगपाय प्रत्यक्षात अनोळखी आणि चमकणाऱ्या वस्तूंना पाहून लांब पळतात .
मॅगपाय आपले घरटे काड्या आणि चिखलाने बनवतो. तो घरट्यात केवळ अन्नासाठी उपयुक्त किंवा घरटे मजबूत करणाऱ्या वस्तूच नेतो, दागिन्यांचा साठा करत नाही.
हा अशा मोजक्या जीवांपैकी एक आहे जो आरशात स्वतःला ओळखू शकतो. ही क्षमता सहसा फक्त माणसे, डॉल्फिन आणि हत्तींमध्ये असते.
जेव्हा एखादा मॅगपाय मृत्युमुखी पडतो, तेव्हा इतर पक्षी तिथे जमा होतात. शास्त्रज्ञ याला 'मॅगपाय फ्युनरल' (अंत्यविधी) म्हणतात.
मॅगपाय आपले अन्न लपवून ठेवतात आणि महिनाभरानंतरही त्यांना ते ठिकाण अचूक आठवते. त्यांची स्मरणशक्ती अफाट असते.