Rahul Shelke
आज सोन्या-चांदीचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. पण 100 वर्षांपूर्वी यांचे दर किती होते, हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
जागतिक तणाव, युद्धसदृश परिस्थिती, महागाई आणि डॉलरमधील हालचालींमुळे सोनं-चांदी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
आजपासून बरोबर 100 वर्षांपूर्वी, म्हणजे 1925 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव होता फक्त 18.75 रुपये.
आज 10 ग्रॅम सोनं सुमारे 1,42,000 ते 1,44,000 रुपयांवर आहे.
18 रुपयांचं सोनं आज 1.4 लाखांवर. गेल्या 100 वर्षांत सोन्याने सुमारे 5,13,300 टक्के रिटर्न दिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव होता सुमारे 0.62 डॉलर प्रति औंस. भारतामध्ये चांदी 70 पैसे प्रति किलो होती.
आज 1 किलो चांदीचा भाव सुमारे 2.80 ते 2.85 लाख रुपये आहे, चांदीनेही गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे.
सोलर पॅनल्स, इलेक्ट्रिक गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमधील वाढती मागणी चांदीच्या किमती वाढवत आहे.
100 वर्षांचा इतिहास सांगतो, संयम ठेवल्यास सोनं नेहमी चमकतं.