Glycerin|थंडीत हमखास लावा ग्लिसरीन! त्वचेसाठी मिळतील 'हे' फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत

पुढारी वृत्तसेवा

ग्लिसरीन (Glycerin) हे त्वचेसाठी एक नैसर्गिक, ह्युमेक्टंट (Humectant) आहे

जे हवेतील आणि त्वचेतील ओलावा आकर्षित करून त्वचेमध्ये टिकवून ठेवते.

कोरडी त्वचा मऊ, चमकदार बनवण्यासाठी ग्लिसरीन उत्तम काम करते.

त्वचेची नैसर्गिक संरक्षणात्मक भिंत (Skin Barrier) मजबूत ठेवते.

त्वचेवरील बारीक सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत होते.

जळजळ, खाज किंवा कोरडेपणामुळे होणारे रॅशेस शांत करते.

हे अतिशय सौम्य असल्याने सेन्सेटिव्ह त्वचेसाठीही उपयुक्त ठरते

२ चमचे गुलाबाच्या पाण्यात ४ ते ५ थेंब ग्लिसरीन मिसळा.

१ चमचा ग्लिसरीन, १ चमचा कोरफडीचा गर, २-३ थेंब लिंबाचा रस एकत्र करा.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.

मुलतानी माती, बेसन, बेस पॅकमध्ये २-३ थेंब ग्लिसरीन टाका

पहिल्यांदा वापरण्यापूर्वी कोपरावर, कानाच्या मागे थोडं लावून २४ तास वाट पहा.

जर लिंबाच्या रसासोबत ग्लिसरीन लावले असेल तर उन्हात जाणे टाळावे.

Hibiscus Hair pack:सुंदर, मुलायम, चमकदार केसांसाठी जास्वंद हेअरपॅक; घरच्या घरी असा बनवा