Glowworm forest |‘अवतार’ चित्रपटातील अदभूत दुनियेसारखे पृथ्वीवरील खरेखुरे जंगल!

Namdev Gharal

आपल्या पृथ्वीवर एक असे जंगल आहे जे तुम्हला अवतार या चित्रपटात दाखवलेले जंगल असते तसेच भासेल, कारण सुर्यास्त झाला की निळया प्रकाशाने हे जंगल चमकते

हे जंगल आहे न्युझीलंडमधील, या देशातील काही भागातील जंगले सुर्य मावळला की एका अद्भूत निळ्या प्रकाशाने उजळून निघतात.

न्यूझीलंडमधील वेटोमो गुहा (Waitomo) आणि उत्तर बेटावरील अनेक जंगले या जादुई दृश्यासाठी प्रसिद्ध आहेत.

ही जादू नाही यापाठीमागे आहे विज्ञान. हा जादुई परिणाम मातीत आणि कुजलेल्या लाकडावर राहणाऱ्या अत्यंत सूक्ष्म 'बायोल्युमिनेसेंट' (जैविक प्रकाश निर्माण करणाऱ्या) सजीवांमुळे होतो.

हे जीव आपल्या शरीरात विशिष्ट रासायनिक अभिक्रिया करून प्रकाश निर्माण करतात, ज्याला 'बायोल्युमिनेसन्स' म्हणतात.

जसजसा अंधार पडतो, तसतसा त्यांच्यातून एक कोमल प्रकाश बाहेर पडतो, ज्यामुळे जंगलाचा तळ जमिनीवर उतरलेल्या ताऱ्यांच्या छतासारखा दिसू लागतो. हे सर्व चित्रपटातील दृशांप्रमाणे भासते

हा प्रकाश सहसा विशिष्ट बुरशी (Fungi) किंवा 'ग्लोवर्म्स' (Glowworms) द्वारे निर्माण होतो, जे एका नैसर्गिक रासायनिक अभिक्रियेतून प्रकाश उत्सर्जित करतात.

कीटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपली प्रजाती पसरवण्यासाठी निसर्गाने या जीवांना ही शक्ती दिली आहे.

हे जीव गुहेच्या छतावरून रेशमी धागे खाली सोडतात, जे चिकट असतात. त्यांचा निळा प्रकाश पाहून छोटे कीटक आकर्षित होतात आणि या धाग्यांमध्ये अडकतात.

याठीकाणी रात्रीच्या वेळी या जंगलातून चालणाऱ्या पर्यटकांना आपण प्रत्यक्ष आकाशगंगेतच (Galaxy) पाऊल ठेवल्याचा भास होतो.

स्पायडरमॅन सरडा