अंजली राऊत
सकाळ आणि रात्री त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या खूप महत्वाची आहे. अनेकदा लोक सकाळी उठून आपल्या चेहऱ्याची काळजी घेतात, पण रात्री त्वचेची अजिबात काळजी घेत नाहीत.
सौम्य आणि साबणरहित फेसवॉशने दिवसातून दोनदा चेहरा धुवा. खूपच गरम पाणी टाळा, त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. चेहरा धुतल्यानंतर लगेच चांगले मॉइश्चरायझर लावा, ज्यामध्ये ग्लिसरीन, हायलुरॉनिक ॲसिड किंवा शिया बटर असावे.
रात्री झोपण्यापूर्वी थोडा जाड क्रीम लावल्यास त्वचेला खोलवर पोषण मिळते. आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब किंवा ओट्स-दहीसारखे घरगुती पॅक वापरा
भरपूर पाणी प्या आणि आहारात विविध फळे, भाजीपाला व ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असलेले पदार्थ खा. ऊन, थंडी किंवा वाऱ्यापासून संरक्षणासाठी सनस्क्रीन आणि स्कार्फचा वापर करा. नियमित काळजी घेतल्यास ड्राय चेहरा मऊ व ताजातवाना दिसतो.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर नारळ तेल लावू शकता. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते, रात्रभर त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल असते जे त्वचेला निरोगी ठेवते.
रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाचे काही थेंब चेहऱ्यावर लावा आणि नंतर हलक्या हातांनी मसाज करा. त्यामुळे हळूहळू त्वचा मऊ आणि चमकदार होईल
रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल चेहऱ्यावर लावू शकता. हे देखील नैसर्गिक मॉइश्चरायझिंग सारखे कार्य करुन त्वचेला हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे मुरुम, डाग यासारख्या समस्यांपासूनही मुक्तता मिळते.
रात्री चेहऱ्यावर मध देखील लावू शकतात. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने त्वचेवरील मुरुम, डाग दूर होऊन त्वचा मऊ होते.