Namdev Gharal
गिरीपुष्प किंवा उंदीरमारी ही निसर्गातील अशी वनस्पती आहे जी उंदरांच्या नियंत्रणासाठी खूप उपयुक्त ठरते, काय आहे वनस्पतीचे रहस्य जाणून घेऊया?
उंदीरमारी किंवा गिरीपुष्प या वनस्पतीचे शास्त्रिय नाव आहे Gliricidia sepium, हे मुळ लॅटीन भाषेतून आले आहे लॅटिन भाषेत Gliricidia या शब्दाचा थेट अर्थ 'उंदरांना मारणारा' असा होतो.
या वनस्पतीचा उपयोग पूर्वापार उंदरांचा नायनाट करण्यासाठी विषारी आमिष (Rodenticide) म्हणून केला जातो.
केवळ बांधावर झाड लावले किंवा झाडाच्या नैसर्गिक वासाने उंदीर पळून जातात हा एक गैरसमज आहे. उंदरांना दूर ठेवण्यासाठी फक्त झाडाची उपस्थिती पुरेशी ठरत नाही.
या झाडाच्या बिया, पाने आणि खोडाच्या सालीमध्ये 'कौमारिन' (Coumarins) आणि इतर विषारी अल्कलॉइड्स असतात. हे घटक उंदराच्या पोटात गेल्यास शरीरात अंतर्गत रक्तस्राव होतो आणि ते मरतात.
उंदीरमारीच्या बिया किंवा सुकलेल्या सालीची बारीक पावडर केली जाते. ही पावडर शिजवलेला भात किंवा धान्याच्या पिठात मिसळून उंदरांच्या बिळाजवळ ठेवली जाते; हे खाल्ल्यावर उंदीर नष्ट होतात.
या झाडाला जेव्हा फूले येतात त्यावेळी गुलाबी रंगाची असतात त्यावेळी डोंगर खूप सुंदर दिसतो. पण फूले येतात त्यावेळी परिसरातील उंदीर पळून जातात असे काही ठिकाणी म्हटले जाते.
उंदीर नियंत्रणाव्यतिरिक्त ही वनस्पती उत्तम हिरवळीचे खत म्हणून उपयुक्त आहे. मात्र, गायी-म्हशींसारखी रवंथ करणारी जनावरे मर्यादित प्रमाणात सुकलेला पाला चारा म्हणून पचवू शकतात.
या झाडाची वाढ खूप झपाट्याने होते त्यामुळे शेतील कुंपण घालण्यासाठी या गिरीपुष्प वनस्पतीचा उपयोग शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात