‘नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकचे फॉलोअर्स किती वाढले? आकडा वाचून थक्क व्हाल

पुढारी डिजिटल टीम

सोशल मीडियावर धुमाकूळ

ब्लू-ग्रीन साडीतील एका व्हिडिओ क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आणि गिरीजा ओक क्षणात 'इंटरनेट क्रश' बनली. नेटिझन्स तिला 'इंडियाची Monica Bellucci' म्हणू लागले.

National Crush Girija Oak | Pudhari

व्हायरल कसं झालं?

लल्लनटॉपच्या इंटरव्ह्यूमधील एक व्हिडिओ ज्यात फिजिक्सच्या “transverse babes, longitudinal babes” किस्स्यावर गिरीजाने सांगितलेली गोष्ट क्षणात ट्रेंड झाली.

National Crush Girija Oak | Pudhari

ब्लू साडीने जिंकली मनं

सोशल मीडियावर तिच्या करिष्म्याची चर्चा आहे. सौंदर्य, सहज बोलण्याची शैली, आणि एलिगंट लुक या तीन गोष्टींनी देशभरातील नेटिझन्स तिच्यावर फिदा झाले.

National Crush Girija Oak | Pudhari

‘इंडियाची Monica Bellucci’?

ट्रोल्स, फॅन पेजेस हे सगळं पाहून गिरीजा म्हणाली, “हे ट्रेंड येतात आणि जातात. माझं काम मात्र कायम राहणार आहे.”

National Crush Girija Oak | Pudhari

चाहत्यांची प्रतिक्रिया

मराठी नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिली की “तुम्ही आता पाहिलंय तिला? आम्ही तिला अनेक वर्षांपासून ओळखतो”

National Crush Girija Oak | Pudhari

शिक्षण आणि कुटुंब

गिरीजाचा जन्म 27 डिसेंबर 1987 रोजी नागपूरमध्ये झाला. तिचे वडील ज्येष्ठ अभिनेता गिरीश ओक आणि आई पद्मश्री फाटक आहेत. तिने बायोटेक्नोलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. तिचे पती दिग्दर्शक सुहृद गोडबोले आहेत.

National Crush Girija Oak | Pudhari

करिअरची सुरुवात कशी झाली?

थिएटर वर्कशॉप्स, बिझनेस मॅनेजमेंट कोर्स आणि मग अभिनय असा तिचा प्रवास आहे. ती मराठी, हिंदी आणि कन्नड सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

National Crush Girija Oak | Pudhari

कोणत्या चित्रपटात काम केलं?

तिने मराठीमध्ये गुलमोहर, लज्जा, नवरा माझा भवरा या चित्रपटात काम केलं आहे तर हिंदीत तिने Taare Zameen Par, Shor in the City, Jawan चित्रपटात काम केलं आहे.

National Crush Girija Oak | Pudhari

इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढले?

इंस्टाग्रामवर तिचे गेल्या 30 दिवसांत 2,13,990 फॉलोअर वाढले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 7,52,026 फॉलोअर्स आहेत.

National Crush Girija Oak | Pudhari

कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी वापरा 'या' टिप्स ...नाक मुरडणारेही..

Bitter melon | Pudhari
येथे क्लिक करा