कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी वापरा 'या' टिप्स ...नाक मुरडणारेही...

पुढारी वृत्तसेवा

कारल्याचा कडूपणा त्‍याच्या बियांमध्ये जास्त असतो. बिया काढून कारले शिजवा, त्‍यामुळे कडवटपणा कमी होईल.

कारले चिरून त्‍यावर मीठ लावून ते 25 ते 30 मिनिटे ठेवा यामुळे कडू रस निघुन जाईल अन् कमी कडू होईल.

कारल्याचे बारीक तुकडे करून त्‍यात दही मिसळून ते तासाभराने फोडणीत टाकल्यावर कडूपणा निघुन जाईल.

कारल्याची भाजी करताना त्‍यात कांदा, शेगदाणे तसेच बडिशेपचा वापर करावा यामुळे कडूपणा कमी होतो.

कारल्याची भाजी करताना त्‍यात थोडा गुळ टाका. यामुळे कडूपणा कमी होईल.

चिंचेचा कोळ पाण्यात टाकून या द्रावणात चिरलेले कारले अर्धातास भिजत ठेवा. यानंतर कारले बाहेर काढून ते पाण्याने धुवून घ्या. यामुळे कडूपणा जाईल. भाजीही चवीला होईल.

चिरलेली कारली थोडावेळ लिंबुच्या रसात ठेवा. थोड्यावेळाने भाजी करताना कारली स्वच्छ धुवून घ्या. लिंबू कारल्याचा कडूनपणा कमी करते.

कारल्याची कोरडी भाजी करताना त्‍यात मोठा कांदा कापून टाका. कारले मिठ घालून तळून घ्या. नंतर त्‍यावर थोडी आमचूर पावडर टाका. भाजी चविष्ट होईल.