Giant Machinery | ही महाकाय मशिन्स पाहाल तर आश्चर्यचकीत व्हाल !

Namdev Gharal

लार्ज हॅड्रॉन कोलायडर

large hadron collider 2010 मध्ये ‘दैवी कण’ (A particle) शोधण्यासाठी या महाकाय मशीनची शास्‍त्रज्ञांनी निर्मिती केली होती. याची लांबी जवळपास २७ किलोमिटर होती

द होन्गाई क्रेन

ही चायनिज कंपनीने तयार केलेली महाक्रेन आहे, याची कपॅसिटी २२ हजार टन वजन उचण्याची आहे. २०१४ साली याची निर्मिती करण्यात आली.

बिग बेर्था

हे आहे जगातील सर्वात मोठे टनेल बोअरिंग मशीन, याच्या माध्यमातून एकाचवेळी ५७ फूट व्यासाचा टनेल खोदता येतो

क्राऊलर क्रेन

XGC 88000 क्राऊलर क्रेन ही जगातील सर्वात मोठी मुव्हेबल क्रेन असून. याच्या माध्यमातून ४००० टन इतके वजन एकाचवेळी उचलता येऊ शकते. ही चिनमध्ये तयार केली आहे.

बॅगर 293

Bagger 293 हे खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात खणण करण्यासाठी वापरले जाते. याची उंची ९६ मिटर असून लांबी २२५ मिटर आहे. एकाचवेळी १४२०० टन माती वाहून नेऊ शकते.

पी ॲन्ड एच एल 2350

P&H L2350 हे एक महाकाय चाकांचे लोडर मशीन आहे. याची कपॅसिटी ३६० इतके वजन उचलण्याची असून खाणीतील ट्रक भरण्याचे काम याच्या माध्यमातून केले जाते.

ट्रॅक्‍स बायस आरएच 400

The Traxx Buyus RH400, हे कॅटरपीलर कंपनीचा अतिविशाल एक्‍सव्हेटर असून. एका बकेटमध्ये ९४ टन इतके वजन ट्रकमध्ये लोड करु शकतो. याचे एकूण वजन ९८० टन आहे.

द लिबेहर आर 9800

The Liebherr R 9800 हा मायनिंग मध्ये वापरला जाणार एक्‍सव्हेटर असून याचे वजन ८०० टन इतके आहे. याला १६ सिंलींडरचे डिझेल इंजिन जोडलेले असते.

कॅटरपीलर 797 मायनिंग ट्रक

The Caterpillar 797 हा खाणकामासाठी वापरला जाणारा महाकाय ट्रक आहे. यामध्ये एकाचवेळेस ४०० टन इतका माल वाहून नेला जातो.

हे आहेत जगातील लोकप्रिय ट्रक