Asit Banage
भारतीय स्वयंपाकघरात तूप आणि लोणी या दोन्ही गोष्टींचा वापर पूर्वांपार चालत आला आहे.
हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ असून यामध्ये फॅटस्, कॅलरीज, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक आढळतात.
मात्र, ते बनवण्याची पद्धत आणि त्यांच्यातील पोषक मूल्यांमध्ये फरक असतो. मात्र, हे दोन्ही पदार्थ ऊर्जेचा चांगला स्रोत ठरतात.
तुपामध्ये फॅटस्सोबतच ‘अ’, ‘ड’, ‘ई’ आणि ‘के’सारखी स्निग्ध पदार्थांत विरघळणारी जीवनसत्त्वे आढळतात.
तुपात असणारे ‘ब्युटिरिक ॲसिड’ आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
लोण्यामध्ये व्हिटॅमिन ‘अ’ आणि काही प्रमाणात प्रथिनांसह इतर पोषक घटक असतात.
मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास हा ऊर्जेचा एक चांगला स्रोत ठरू शकतो. तूप आणि लोणी या दोन्हीमध्ये कॅलरीज आणि फॅटस्चे प्रमाण जास्त असते.
त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी किंवा हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या व्यक्तींनी या दोन्हीचेही सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे.