Anirudha Sankpal
एनेलिस मिशेल (Anneliese Michel) यांचा जन्म १९५२ मध्ये जर्मनीतील एका अतिशय धार्मिक कॅथोलिक कुटुंबात झाला.
१६ वर्षांच्या वयात त्यांना तीव्र दौरे (Seizures) पडू लागले, ज्यावर डॉक्टरांनी दौरे थांबवणाऱ्या आणि मानसिक आजाराच्या औषधी दिल्या.
औषधोपचारानंतरही त्यांची तब्येत बिघडत गेली, त्या उदास राहू लागल्या आणि त्यांना सतत मतिभ्रम (Hallucination) होऊ लागले.
त्यांना दिवसाढवळ्या भयंकर शैतानी चेहरे दिसायचे आणि प्रार्थना करताना विचित्र आवाज ऐकू यायचे. त्या धार्मिक चिन्हे आणि क्रॉस (Cross) सुद्धा सहन करू शकत नव्हत्या.
डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना टेम्पोरल लोब एपिलेप्सी (Temporal Lobe Epilepsy - TLE) नावाचा आजार असल्याचे निदान केले.
अनेक वर्षे औषधे घेऊनही सुधारणा न झाल्यामुळे, कुटुंबाचा आणि परिसरातील लोकांचा विश्वास बसला की त्या वेगवेळ्या सहा वाईट आत्म्याच्या प्रभावाखाली आहेत.
Exorcism (भूत-प्रेत पळवणारा विधी) दरम्यान, दावा केला गेला की एनेलिस मिशेल एकाच वेळी ४ वेगवेगळ्या विदेशी भाषांमध्ये बोलत होत्या, ज्या त्यांनी कधीही शिकल्या नव्हत्या.
अचानक वेगळ्या पद्धतीने बोलण्याच्या किंवा विदेशी भाषेच्या लहेजात बोलण्याच्या या स्थितीला फॉरेन ॲक्सेंट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome - FAS) म्हणतात.
FAS हा मेंदूच्या डाव्या बाजूला असलेल्या Broca’s Area मध्ये दुखापत किंवा बिघाड झाल्यामुळे होतो, कारण हा भाग भाषण (Speech) नियंत्रित करतो.
हा आजार अत्यंत दुर्मिळ (Very Rare) आहे आणि जगातील फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. या सिंड्रोमने पीडित लोकांना त्यांची स्थिती सिद्ध करणे कठीण जाते, लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.