पुढारी वृत्तसेवा
आपल्या शरीराची बरीच माहिती जनुकांमध्ये असते. काही लोकांमध्ये जनुकांमधल्या बदलांमुळे रक्तात वाईट कोलेस्टेरॉल जास्त वाढू शकतं.
कोलेस्टेरॉल वाढलं तरी लगेच काही लक्षणं दिसतीलच असं नाही. त्यामुळे आपल्याला काही त्रास नसला, तरी वेळोवेळी रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे.
घरात कुणाला कमी वयात हृदयविकार झाला असेल किंवा कोलेस्टेरॉल खूप जास्त असेल, तर ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रोजच्या जेवणात ओट्स, डाळी, कडधान्यं, फळं आणि भाज्या खा. यामुळे शरीरातलं वाईट कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होऊ शकते.
वारंवार तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ आणि जास्त चरबीयुक्त अन्न खाणं टाळा. त्याऐवजी बदाम, अक्रोड आणि योग्य प्रमाणात चांगल्या तेलाचा वापर करा.
दररोज चालणं, सायकल चालवणं किंवा हलका व्यायाम करणं फायद्याचं ठरतं. वजन नियंत्रणात ठेवलं, तर हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.
जनुकांमुळे कोलेस्टेरॉल वाढत असेल, तर फक्त खाण्यापिण्यात बदल करून पुरेसा फायदा होईलच असं नाही. काही लोकांना औषधांचीही गरज पडते.
घरात कोलेस्टेरॉलचा त्रास असेल, तर स्वतःचीही तपासणी करून घ्या. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करता येऊ शकतो.