स्वालिया न. शिकलगार
वेस्टर्न असो वा साडी, लेहेंगा असो वा इंडो-वेर्स्न, प्रत्येक लूकमध्ये जेनेलिया नेहमीच लक्ष वेधून घेते
जेनिलिया देशमुख ही आपल्या मोहक हास्यासाठी, सहज सुंदर लूकसाठी नेहमीच चर्चेत असते
अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा तिचं नाव चर्चेत आलं आहे
या फोटोमध्ये जेनिलियाने एक सुंदर प्रिंटेड ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती अतिशय फ्रेश आणि ग्लोइंग दिसते
चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे
फोटोमध्ये जेनिलिया अतिशय साध्या पण आकर्षक अंदाजात दिसते
हलका मेकअप, सुंदर हेअरस्टाईल, तिचं ते नैसर्गिक हास्य या सगळ्यांमुळे तिचा लूक आणखी खुलून दिसतो
या नव्या फोटोमधून केवळ तिचा लूकच नाही तर अप्रतिम सौंदर्य प्रतीत करते