Gen Z मध्ये उजव्या विचारधारेकडे मुलींपेक्षा मुलांचा कल जास्त का?

मोहन कारंडे

द. कोरियासह जगभरातील लोकशाही देशात Gen Z मतदारांमध्ये लिंगाधारित राजकीय फाटाफूट वाढली आहे. तरूण उजव्या पक्षांकडे तर तरूणी डाव्या विचारांच्या पक्षांकडे

युरोप, अमेरिका आणि आशियातील निवडणुकांमध्येही हा ट्रेंड

फ्रान्समध्ये तरुणांनी उजव्या विचारांच्या मरीन ले पेन यांना महिला मतदारांपेक्षा अधिक प्रमाणात मतं दिली.

ब्रिटनमध्येही तरुण मतदार अधिक प्रमाणात उजव्या पक्षांना मतदान करतात.

जर्मनीत अलीकडील निवडणुकीत 18 ते 24 वयोगटातील 27% पुरुषांनी उजव्या 'AfD' पक्षाला मतदान केलं, तर महिलांनी 35% मतं डाव्या 'लिंके' पक्षाला दिली.

दक्षिण कोरियात 3 जून रोजी होणारी अध्यक्षीय निवडणूक या ट्रेंडचं आणखी एक ठळक उदाहरण ठरणार आहे.

सर्वेक्षणानुसार महिलांचा कल डाव्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांकडे आहे.

पण तरुणांचा कल वेगळा आहे. 18 ते 29 वयोगटातील सुमारे 30% तरूण ‘रिफॉर्म’ या उजव्या पक्षाला पाठिंबा देणार आहेत.

तरूणांचा उजव्या पक्षांकडे कल का? 

अर्थतज्ज्ञ सूह्यून ली यांच्या मते, पुरुषांना नोकरी मिळवणं, लग्न करणं, घर घेणं आणि कुटुंब वाढवणं अशक्य वाटतं. त्यांना वाटतं नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य दिलं जातं.

तरूणी डाव्या पक्षांकडे का झुकतायत?

महिला समानतेच्या मुद्द्यांवर गंभीर. आर्थिक असमानता, पर्यावरण यावर डावे पक्ष अधिक काम करतात. उजव्या विचारांतील लिंगभेदाविरोधात नाराजी.

मिलेनियल पिढीतही लिंगाधारित फरक

हा ट्रेंड फक्त Gen Z मध्येच नाही, तर 30 ते 40 वयोगटातील 'मिलेनियल्स'मध्येही दिसतो आहे.

कॅनडामध्ये झालेल्या निवडणुकीत 35-54 वयोगटातील पुरुषांनी विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मतं दिली. मात्र महिलांच्या मतांमुळे लिबरल पक्ष पुन्हा सत्तेत आला.

जुना ट्रेंड काय होता?

तरुण महिला आणि पुरुष प्रगतिशील पक्षांना मत देत असत. पण आता हे चित्र पूर्ण बदलत आहे.

भारताचे प्रचंड आकाराचे आंतराष्‍ट्रीय बंदर ‘विझिंजम’