Anirudha Sankpal
तब्बल १५ वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेनं भारताला भारतात हरवून विक्रम केला.
मात्र यामुळं टीम इंडियातील नवख्या खेळाडूंसोबतच प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
सध्या गंभीरची राहुल द्रविड अन् रवी शास्त्री यांच्याशी तुलना होत आहे. तर पाहुयात कसोटी क्रिकेटमध्ये कोणाचा किती आहे Winning Ratio
रवी शास्त्री यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटी सामने खेळले. त्यातील २५ सामन्यात विजय मिळाला.
रवी शास्त्रींच्या काळात भारताला १३ कसोटी सामन्यात पराभव पहावा लागला. त्यांचा विनिंग रेशो हा १.९२ इतका आहे.
दुसरीकडं सर्वांचा लाडका राहुल द्रविड ज्यावेळी प्रशिक्षक होता त्यावेळी टीम इंडियानं २४ कसोटी सामन्यांपैकी १४ कसोटी सामन्यात विजय मिळवला होता.
त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीमला ७ सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्याचा विनिंग रेशो हा २ इतका आहे.
गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सांभाळत असल्यापासून संघानं १८ कसोटी सामने खेळलेत. त्यातील फक्त ७ सामन्यात विजय मिळवता आला आहे.
गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना टीम इंडियाला तब्बल ९ पराभवांना सामोरं जावं लागले. त्याचा विनिंग रेशो हा ०.७७ इतका कमी आहे.